अभिनेते सयाजी शिंदे
यांच्यावर मधमाशांचा हल्ला

पुणे: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. सयाजी शिंदे यांनी पुणे बंगळुरू महामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण करत होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाश्या सयाजी शिंदे यांच्या डोळ्यावर आणि मानेला चावल्या. सयाजी शिंदे हे सुखरुप आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.

पुणे बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी शिंदे तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आले. सयाजी शिंदे यांनी माहिती दिली की, ‘ते सुखरुप आहेत. या घटनेत सयाजी शिंदे यांना दुखापत झालेली नाही. मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. परंतु काळजीचे काही कारण नाही, मला दोन-तीन माश्या चावल्या आहेत. कानाभोवती थोडी सूज आली आहे. मात्र आम्ही आता सुखरूप आहोत.\’ अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे.

Scroll to Top