मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांचे आज निधन झाले. त्यांचे वय 94 होते. त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. अनेक चित्रपटांतील त्यांच्या आईच्या भूमिका गाजल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज त्यांना दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुलोचना या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर होत्या. सुलोचना दीदींनी 40 च्या दशकात मराठी सृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. प्रमुख भूमिका साकारत त्यांनी जवळपास दोन दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सोज्वळ नायिका ते सहाय्यक अभिनेत्री तसेच मायाळू आईच्या भूमिका त्यांनी आपल्या सहजसुंदर
अभिनयाने साकारल्या.
अभिनेत्री सुलोचना यांचे वृद्धापकाळाने निधन
