अमरावती
गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना आज सकाळी अमरावती शहराच्या सराफ बाजारातील त्रिमूर्ती सोन्या-चांदीच्या शोरूमला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या.शोरूमच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती. त्यांनतर स्थानिकांनी शोरुम परिसरात प्रचंड गर्दी केली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले. ही आग शॉट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमरावतीत ज्वेलर्सच्या शोरूमला आग
