लंडन
अमेरिका आणि ब्रिटनच्या हवाई दलांनी 6 देशांच्या पाठिंब्याने येमेनमधील हुथी बंडखोरांच्या 8 ठिकाणांवर पुन्हा मोठा हल्ला केला. त्यात हुथी बंडखोरांचे 18 तळे उद्ध्वस्त झाले असून या हल्ल्यांत हुथी बंडखोरांचे भूमिगत शस्त्रे आणि क्षेपणास्त्र साठवण सुविधा, हवाई संरक्षण यंत्रणा, रडार आणि हेलिकॉप्टरचे प्रचंड नुकसान झाले.
हुथी बंडखोरांनी जहाजांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिका-ब्रिटनच्या हवाई दलांनी पुन्हा ही कारवाई केली. अमेरिकन आणि ब्रिटिश लष्कराच्या या कारवाईला ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड आणि न्यूझीलंडचा पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले की, हुथी बंडखोरांनी आमच्या जहाजांना लक्ष्य करणे सुरू ठेवला आहे. त्यामुळे आम्ही हुथी बंडखोरांवर हल्ला केला आहे. हुथी बंडखोरांनी हल्ले थांबवले नाहीत, तर भविष्यात त्यांच्यावर अशीच लष्करी कारवाई केली जाईल.