अमेरिकेत गर्भातील बाळाच्या मेंदूवर प्रथमच शस्त्रक्रिया

वॉशिंग्टन – अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या बोस्टन येथील रुग्णालयात डॉक्टरांनी आईच्या गर्भातील बाळाच्या मेंदूवर अतिशय अवघड यशस्वी शस्त्रक्रिया केली. जगातील ही अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
गर्भातील बाळाला रक्तवाहिनीशी संबंधित (व्हेन ऑफ गॅलेन) एक विकार होता. मेंदूची शस्त्रक्रिया झाली नसती तर या बाळाच्या जन्मानंतर हृदयक्रिया बंद पडून किंवा पक्षाघाताने त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यामुळे 34 आठवड्यांची गर्भवती महिला केन्यत्ता कॉलमॅन हिच्या पोटातील गर्भात असलेल्या बाळाच्या मेंदूवर दहा डॉक्टरांच्या पथकाने अल्ट्रासाऊंड तंत्राच्या सहाय्याने अतिशय अवघड शस्त्रक्रिया पार पाडली. त्यानंतर काही दिवसांनी केन्यत्ताने एका मुलीला जन्म दिला. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर डेरेन ऑरबॅक यांनी सांगितले की, या मुलीची प्रकृती उत्तम आहे.
यंदा दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी गर्भात असलेल्या एका बाळावर हृदयशस्त्रक्रिया केली होती. त्या बाळाचे हृदय एखाद्या द्राक्षाच्या आकाराचे होते.या शस्त्रक्रियेत हृदयाचे बलून डायलेशन करण्यात आले. त्याद्वारे हृदयाच्या झडपेतील अडथळे दूर
करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top