अयोध्येत मंदिरांच्या म्युझियम बनणार

अयोध्या – राम मंदिरा मुळे जगभर प्रसिद्धीच्या झोतात आलेले अयोध्या शहर आता मंदिर नागरी बनणार आहे . अयोध्येत मंदिरांचे मोठे म्युझियम बनवले जाणार आहे. त्यासाठीच्या ६५० कोटींच्या प्रस्तावाला आज योगी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली
अयोध्येत राम मंदिर बनल्यापासून येथे रोज जगभरातून हजारो भक्तदर्शनासाठी येत आहेत . त्यामुळे अयोध्येचा आणखी विकास करण्यासाठी देशातील काही बड्या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातील टाटा सन्स या कंपनीने केंद्राला यापूर्वीच अयोध्येच्या विकासाबाबत प्रस्ताव दिला होता. त्यानुसार अयोध्येत मंदिरांचे म्युझियम बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर केंद्र आणि राज्य सरकार गेल्या काही महिन्या पासून काम करीत होते. अखेर या प्रस्तावाला आज योगी सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. टाटा सन्स ही टाटांच्या इतर कंपन्यांची प्रमोटर आहे. याच कंपनीच्या माध्यमातून अयोध्येत मंदिरांचे म्युझियम उभारले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top