मुंबई :
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएल २०२३ मध्ये पदार्पण केले. अर्जुनच्या खेळाकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष आहे. तसेच नेटकऱ्यांचे त्याच्या मैदानातील हालचालींवर देखील बारिक लक्ष आहे. गेल्या २ दिवसांपासून अर्जुनाचा एक किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अर्जुन नाकात बोट घालताना दिसला आणि मग तेच बोट तो तोंडात घालतो, असे दिसत आहे. प्रत्यक्षात त्याने आधी आपले नख चावले आणि नंतर बोट नाकात घातले. त्याचा हा प्रकार कॅमेरामनने आपल्या व्हिडिओत कैद केला. पण नंतर नेटकऱ्यांनी अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर आधीचा क्रम नंतर करून शेअर केला आणि साहजिकच तो व्हायरल होऊ लागला. यानंतर काही फॅन्सनी पेजवर मूळ व्हिडीओ शेअर केला.