नवी दिल्ली- प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळणार्या ‘अल्झायमर’ अर्थात स्मृतिभ्रंश या असाध्य आजारावर आता भारतीय शात्रज्ञांनी औषध शोधले आहे, असा दावा विज्ञान मंत्रालयाने केला आहे. चेस्टनट आणि ओक या झाडांच्या पानापासून हे औषध बनवले आहे. ‘अल्झायमर’ हा मेंदू चा आजार आहे. तो मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो. या आजाराला सोप्या भाषेत ‘विस्मरणाचा आजार’ असे म्हणतात. याचे नाव अलाॅईस अल्झायमरवरून ठेवले आहे. त्यानेच सर्वात अगोदर या रोगाचे निदान केले. हा आजार झालेल्या माणसाची स्मृती कालांतराने इतकी कमी होते की तो माणूस अन्न चावणे आणि पाणी पिणेही विसरतो. या आजाराची नेमकी कारणे आतापर्यंत सापडलेली नव्हती. मात्र, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च या संस्थेतील शास्त्रज्ञांनी या आजारावर संशोधन केले.
अल्झायमर ‘ आजारावरील औषधाचा भारतात शोध
