अहमदनगर – अहमदनगर शहरातील फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरुस निमित्त मुकुंदनगर परिसरातून चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर ते चालवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंगजेबाचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही.
अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा फोटो झळकवल्याने खळबळ
