अहमदनगरमध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळले

अहमदनगर -पुण्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले. संगमनेर तालुक्यात दोन गरोदर महिलांना झिकाची लागण झाली आहे. तपासामध्ये दोन गरोदर महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेय. या महिलांची प्रकृती स्थिर आहे. तसेच गर्भाशयसुद्धा चांगल्या स्थितीत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.