अहमदनगर- अहमदनगर शहरातील मंदिरांत उद्यापासून तर जिल्ह्यामधील मंदिरांत दोन महिन्यांच्या आत ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे अंग प्रदर्शन होईल, असे अशोभनीय कपडे, तोकडे कपडे, बर्मुडा,असे वस्त्र घालून मंदिरात प्रवेश करू नये, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केले.
अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर, तुळजाभवानी माता मंदिर (बुरानगर),श्री शनि मारुती मंदिर (माळीवाडा), शनि मारुती मंदिर (दिल्ली गेट), शनि मारुती मंदिर (झेंडीगेट), तुळजाभवानी माता मंदिर (सबजेल चौक),श्री गणेश राधा कृष्ण मंदिर (मार्केट यार्ड), श्रीराम मंदिर पवन (पाईप लाईन रोड), श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (पाईप लाईन रोड), श्रीराम मंदिर (वडगाव गुप्ता), पावन हनुमान मंदिर (वडगाव गुप्ता) श्री संत बाबाजी बाबा मंदिर (वडगाव गुप्ता) श्री साईबाबा मंदिर (केडगाव) श्री खाकीदास बाबा मंदिर या मंदिरांत उद्यापासून आणि अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये दोन महिन्याच्या आत वस्त्र सहिंता लागू होणार असल्याचे सुनील घनवट यांनी सांगितले.