अहमदनगर जिल्ह्यात
तीन दिवस पाऊस

अहमदनगर- संगमनेर तालुक्‍यात येत्या शुक्रवार पासून ते रविवारपर्यंत तीन दिवसात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्‍त केला आहे. राज्यात ७, ८, ९ एप्रिल दरम्यान विदर्भ व मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जळगाव या भागात पावसाचा जोर राहील. अवकाळी पावसामुळे कांदा, हळद, मका, गहू तसेच कोकणातील आंबा पिकाची या अवकाळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे.

Scroll to Top