मुंबई – एसटी आंदोलनावेळी चर्चेत आलेले अॅड.गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरिता रद्द करण्यात आली आहे. अॅड. सुशील मंचरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सदावर्ते यांनी वकिलाचा काळा कोट परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. सार्वजनिक ठिकाणी वकिली कोट घालण्याच्या या कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते, असे म्हणत वकील सुशील मंचरकर यांनी 2022 मध्ये सदावर्ते यांच्या विरोधात शिस्तपालन याचिका दाखल केली होती. याबद्दल बार काऊन्सिलच्या 3 सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची 2 वर्षांसाठी सनद रद्द केली आहे. हा गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जात असून, यामुळे आता पुढील दोन वर्षे त्यांना वकिली करता येणार नाही.
अॅड.गुणरत्न सदावर्ते यांची