नंध्याल – आंध्र प्रदेशातील नंध्याल जिल्ह्यात आज बोट उलटून दुर्घटना घडली. अवुकू जलाशयात ही बोट उलटली. या दुर्घटनेत १२ पर्यटक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता झालेले सर्व एका हेड कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील आहेत. बोट बुडाल्याची माहिती मिळताच ‘एसडीआरएफ’च्या पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले.
याआधीही काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत बोट उलटून सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी सुमारे १० जणांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी त्या भागातील सर्व बोटिंग सेवा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई देण्याची घोषणाही केली होती.