हदगाव
नांदेड जिल्हयातील तामसा येथील गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा शुक्रवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. आईच्या मृत्यूची बातमी कळताच घरी आलेल्या मुलीने हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच प्राण सोडले. ही घटना शुक्रवारी घडली. जयमाला दिलीपराव जाधव (५६) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. एकाच दिवशी घरात दोन मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नांदेड मधील हदगाव तालुक्यातील तामसा येथील गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा शुक्रवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. गयाबाई यांची मुलगी जयमाला जाधव काही अंतरावरील येवली गावातील रहिवासी होत्या. आईच्या मृत्यूची बातमी समजताच जयमाला अंत्यदर्शनासाठी माहेरी गेल्या.आईचा मृतदेह पाहून जयमाला यांनी हंबरडा फोडला. \’आई तुझ्याशिवाय माझे कसे होणार\’, असे म्हणत त्या मृतदेहावर कोसळल्या. त्यांना लागलीच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.