कराड – रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या मंगळवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी १.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे असणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली.
या सभेत मागील सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून विषय पत्रिकेवरील विषयांवर विचारविनिमय केला जाणार आहे. या सभेस येताना सभासदांनी प्रवेशपत्रिका,ओळखपत्र / स्मार्ट कार्ड आणणे बंधनकारक असणार आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले आहे.