मुंबई- गुढीपाडव्यनिमित्त यंदा गुढी सूर्योदयापासून सकाळी ९ वाजेपर्यंत केव्हाही उभारता येणार आहे, अशी माहिती देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे यांनी दिली आहे.
पं.गौरव देशपांडे यांनी सांगितले की, सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. या महिन्यातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा असतो. तो साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जातो. यादिवशी नवीन कामांना प्रारंभ केला जातो.नवरात्र घटस्थापना केली जाते.पहाटे उठून अभ्यंगस्नान करून गुढी उभारली जाते.गुढी बरोबर पंचांगाचे पूजन केले जाते. यादिवशी श्रीरामाच्या नवरात्र उत्सवास सुरुवात होते. गुढी उभारल्यानंतर कडूनिंबाची पाने,ओवा, जिरे, चिंच, गूळ आणि हिंग घालून हे अमृतप्राय मिश्रण प्राशन केले जाते. त्यामुळे आरोग्य प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे. उद्या पाडव्याच्या दिवशी तुम्ही जशी मनस्थिती ठेवाल, तसे वर्ष जाते त्यामुळे यादिवशी मन प्रसन्न आणि आनंदी ठेवावे, सोने खरेदी ,वाहन खरेदी किंवा कोणतेही नवीन काम करण्यास हा दिवस शुभ मानला जातो, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.
आज नव वर्षाचा पहिला दिवस