आता एकाच रक्त चाचणीत होणार ५० प्रकारच्या कर्करोगाचे निदान

लंडन – कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार समजला जातो.हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही.यातील कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहे.आता याच कर्करोगाच्या निदानाची पद्धत मात्र विकसित करण्यात ब्रिटनच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. आता एकाच रक्त चाचणीतून तब्बल ५० प्रकारच्या कर्करोगाचे निदान होणार आहे.त्यामुळे या आजाराच्या निदानासाठी पुन्हा पुन्हा चाचण्या करण्याची गरज भासणार नाही.विशेष म्हणजे ही रक्ताचाचणी तज्ज्ञ डॉक्टरऐवजी सामान्य डॉक्टर करू शकेल.
या रक्त चाचणीला ‘ गॅलरी ब्लड टेस्ट” असे नाव दिले आहे.या चाचणीच्या माध्यमातून रक्तातील डीएनचे परिक्षण केले जाते. यामुळे कर्करोगाचे निदान लवकर होण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करण्यास मदत होणार आहे,असे प्रा.डॉ.ब्रायन निकोलस यांनी सांगितले.ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने या चाचणीचे परीक्षण नुकतेच करण्यात आले.५०० रुग्णांच्या सहभागातून हे परीक्षण करण्यात आले. विशेष या चाचणीतून कर्करोगाची सुरुवात नेमकी कोणत्या अवयवापासून झाली हे कळणार आहे. ९८ टक्के प्रकरणात यासंदर्भातील अचूक निदान करण्यात आले आहे.मात्र ही चाचणी पूर्णपणे दोषमुक्त झालेली नाही. त्यावर आणखी संशोधन आणि सुधरणा करण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top