नवी दिल्ली- देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे.देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत आहे.केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती.यानंतर आता देशातील सर्वोत्तम मानल्या जाणार्या सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांना कोरोना संसर्ग झाला आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेली समलैंगिक विवाह प्रकरणाची सुनावणी तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस,एस रवींद्र भट,जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा या न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.यातील न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांचा समलैंगिक विवाह प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठामध्ये समावेश आहे.याआधी सुप्रीम कोर्टाचेच न्यायमूर्ती सूर्यकांत यांना कोरोना संसर्ग झाला होता.पण ते नुकतेच एक आठवड्यापूर्वी बरे झाले आहेत.दरम्यान, सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सुप्रीम कोर्टात वकील,पक्षकार, नागरिक यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.
आता सर्वोच्च न्यायालयातील ४ न्यायाधीशांना कोरोना लागण
