आता सोन्याच्या दागिन्यांवर
सहा अंकी हॉलमार्क अनिवार्य

नवी दिल्ली- आता येत्या ३० मार्च नंतर सोने आणि दागिन्यांची खरेदी आणि विक्री करताना त्या दागिन्यांवर सहा अंकी हॉलमार्क असणे अनिवार्य आहे. १ एप्रिल पासून हा नवीन नियम लागू होणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

१ एप्रिलनंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन शिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृती विकल्या जाणार नाहीत. चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर १ एप्रिल पासून फक्त सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. त्याशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत.ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सरकारने शुक्रवारी सांगितले की १ एप्रिलपासून सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर शिवाय परवानगी दिली जाणार नाही.सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी सरकारने दीड वर्षापूर्वी प्रयत्न सुरू केले होते.

Scroll to Top