बंगळुरू
इस्रोची पहिली सूर्य मोहीम असलेल्या आदित्य एल वन अंतराळयानाने आज पहाटे २ वाजता पृथ्वीभोवतीची चौथी प्रदक्षिणा पूर्ण केली. या फेरीला अर्थ बाउंड मॅन्यूव्हर म्हणतात. सध्या आदित्य एल 1 पृथ्वीभोवती 256 किमी बाय 121973 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.
१९ सप्टेंबरला आदित्य एल 1 त्यांची पाचवी पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. आदित्य एल 1 ची पृथ्वीभोवतीची ही शेवटची कक्षा असणार आहे. त्यानंतर आदित्य एल 1 हे लॅग्रेंज पॉइंट 1च्या दिशेने प्रवास सुरू करणार आहे.
एक्सवरून माहिती देताना इस्रोने म्हटले आहे की, आदित्य एल 1 ची पृथ्वीभोवतीची चौथी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण झाली. बंगळुरू येथील सतीश धवन अंतराळ केंद्र आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्रोच्या ग्राउंड स्टेशन्सनी या प्रदक्षिणेचा आढावा घेतला. आदित्य फिजी बेटावरील वाहतूक करण्यायोग्य टर्मिनल अवकाशयानाला पोस्ट-बर्न ऑपरेशनमध्ये मदत करणार आहे. आदित्य एल-वन हे लॅग्रेंज पॉइंट वन वर पाठवले जात आहे. लँग्रेज पॉइंट 1 चे पृथ्वीपासूनचे अंतर १५ लाख किलोमीटर आहे, तर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर १५ कोटी किलोमीटर आहे.
आदित्यने पृथ्वीभोवतीची चौथी प्रदक्षिणा पूर्ण केली
