औरंगाबाद – मराठवाड्यात शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वीच आज दुपारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनीदेखील आपल्या व्यथा मांडल्या. त्यावर ‘धीर सोडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले. उद्या आदित्य ठाकरे नाशिकचा दौरा करणार असून तेथेही ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या पाहणी दौऱ्यात आदित्य ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांची भावना तीव्र आहेत. यंदा उशिरा पाऊस झाला, त्यात मागच्या वर्षी ओला दुष्काळ होता. मात्र शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत मिळाली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. आधीचे कृषीमंत्रीदेखील कधी बांधावर दिसले नाहीत, स्वतःच्या मतदारसंघातदेखील ते बांधावर गेले नाहीत. आताचे कृषीमंत्री उद्या शेतकऱ्यांच्या बांधावर येतील, फक्त घोषणा करतील. कृषीमंत्री बांधावर येणार आहेत का आणि बांधावर आल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का, महाराष्ट्रातील शासन बिल्डर आणि कंत्राटदार यांचे झाले आहे. कदाचित उद्योगपती, बिल्डर आणि कंत्राटदारांचे कर्ज असते तर ते सरकारने माफ केले असते. शेतकऱ्यांचे शेतकरी असणेच गुन्हा ठरत असून त्यांचे कर्ज