मुंबई
दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची पत्नी आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांच्या निधनामुळे अभिनेता अमिताभ बच्चन भावूक झाले. त्यांनी भावूक पोस्ट टाकत चोप्रांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.‘आयुष्य जागच्या जागी थांबले आहे,अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. अमिताभ बच्चन ब्लॉगमध्ये पोस्टर करताना म्हणाले की, ‘त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला होता. चित्रपट निर्मिती, संगीतांच्या बैठका, घरातील आणि घराबाहेरील गेट टुगेदर.. सर्वकाही एका क्षणात निघून गेले. एक एक करून सर्वजण सोडून जात आहेत. आपल्यामागे ते एकत्र घालवलेले सुंदर क्षण सोडून गेले आहेत. आयुष्य खूप कठीण आणि अंदाज न लावता येण्यासारखे आहे
. दरम्यान, पामेला चोप्रा यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमिताभ बच्चन मुलगा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यासह पामेला यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले होते.
‘आयुष्य जागच्या जागी थांबले` अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट
