‘आरआरआर’ मधील खलनायक रे स्टीव्हन्सन यांचे निधन

इटली:

‘आरआरआर’ चित्रपटातील खलनायक अभिनेता रे स्टीव्हन्सन यांचे निधन झाले आहे. रविवारी (२१ मे) इटली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. रे स्टीव्हन्सन यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. ‘आरआरआर’ या सिनेमात रे स्टीव्हन्सन खलनायकाच्या भूमिकेत होते. रे स्टीव्हन्सन यांच्या निधनावर ‘आरआरआर’ च्या टीमने दुख व्यक्त केले आहे.

‘आरआरआर’च्या सोशल मीडिया पेजवरुन टीमने रे यांना श्रद्धांजली वाहिली. चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनीही इन्स्टा स्टोरीद्वारे त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रे स्टीव्हन्सनचा जन्म २५ मे १९६४ रोजी लिस्बर्न, उत्तर आयर्लंड येथे झाला होता. त्यांनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस युरोपियन टीव्ही मालिका आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘आरआरआर’ या चित्रपटातून त्यांना भारतात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. एंटोनी फुक्काच्या ‘किंग आर्थर'(२००४), लेक्सी अॅलेक्झांडरच्या ‘पनिशर: वॉर जोन’ (२००८), ह्यूजेस ब्रदर्सच्या ‘द बुक ऑफ एली'(२०१०) आणि एडम मैककेच्या ‘द अदर गाइज'(२०१०) सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top