आरटीई प्रवेशांसाठी २५ एप्रिलपर्यंत कागदपत्रांची तपासणी करता येणार

मुंबई – महाराष्ट्रात राईट टू एज्युकेशन (आरटीई) अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी अर्ज करण्यात आले होते. यासाठी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया पार पडली. आता निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र तपासण्याची मुदत १३ एप्रिल २०२३ पासून २५ एप्रिल २०२३ पर्यंत आहे.

५ एप्रिल २०२३ रोजी सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली. ही नावे १२ एप्रिल २०२३ रोजी आरटीई प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आली. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाला. मात्र, पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई प्रणालीवरील अर्जाची स्थिती आपला अर्ज क्रमांक लिहून सोडत लागली अथवा नाही याची खात्री करावी. त्यानंतर सोडत लागलेल्या विद्यार्थ्यांना २५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान शाळेमध्ये प्रत्यक्ष प्रवेश मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top