मुंबई
अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा आणि अभिनेत्री सोनी राजदान यांचे वडील नरेंद्रनाथ राजदान यांचे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आलिया आणि सोनी यांनी नरेंद्रनाथ यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले.
आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. ‘डॅडी, ग्रँडपा, निंदी तुम्ही आमच्यासाठी पृथ्वीवरील एका एंजल सारखे होता,’ असे या फोटोला कॅप्शन दिले आहे. आलियानेदेखील तिच्या आजोबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले की, ‘माझे आजोबा. माझे हिरो, ते ९३ वर्षाचे असताना गोल्फ खेळत होते, वयाच्या ९३ वर्षापर्यंत त्यांनी काम केले, ते चविष्ट ऑम्लेट बनवत होते.’ मसाबा गुप्ता, करण जोहर, दिया मिर्झा या सेलिब्रिटींनी या व्हिडिओला कमेंट करुन नरेंद्रनाथ यांना श्रद्धांजली वाहिली.