कुनो – कुनो राष्ट्रीय उद्यानातील आशा चित्ता मादी पुन्हा एकदा पळाली. शिवपूरी जिल्ह्यातील बेराड तहसीलच्या धोरिया गाझीगढच्या हिरवाईत तिचे शेवटचे ठिकाण होते. कुनो वनखात्याचे पथक त्याठिकाणी पोहोचले आहे. ‘रेडिओ कॉलर’च्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधला जात आहे.
बुधवारी संध्याकाळी आशा पार्कच्या बफर झोनच्या बाहेर पळाली पण ती परतीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. मात्र चार दिवसात तिने एकदाही शिकार केलेली नाही, त्यामुळे खात्याचे अधिकारी चिंतेत आहेत. या आधी ‘पवन’ या चित्त्याने दोनदा कुनोच्या जंगलातून बाहेर धूम ठोकली होती. आता ‘आशा’ ही मादी चित्तादेखील उद्यानातून बाहेर पडली आहे. त्यामुळे वनखात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. काही दिवसांपूर्वीही आशा कुनोच्या बाहेर गेली होती.परंतु स्वतःहून परतली होती.