आशियाई कुस्तीसाठी धनराज शिर्केची निवड

पुणे – पुणे येथील धनकवडी येथे राहणाऱ्या पैलवान धनराज शिर्के याची आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ही स्पर्धा किर्गिझीस्थान (बिस्केक) येथे होणार आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड चाचणी खुल्या पद्धतीने हरियाणा येथे आयोजित करण्यात आली होती. या चाचणी स्पर्धेत धनराज याने ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील आपले स्थान पक्के केले.

या निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्रासह भारतातील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता. धनराज धनकवडी येथील जयनाथ तालीमीचा पैलवान असून त्याचे वडील वस्ताद भरत शिर्के हेही कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान आहेत. यापुर्वीही धनराजने आपल्या चमकदार कामगिरीने विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top