मुंबई – भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. भेटीमागचे कारण कळलेले नाही. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचे म्हटले जात आहे. या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेही उपस्थित असल्याचे म्हटले जाते.
आशिष शेलार हे बीसीसीआयचे खजिनदार आहेत. क्रिकेटच्या संदर्भात शेलार यांनी यापूर्वीही शरद पवार यांची भेट घेतली होती. भारतातील आगामी वर्ल्ड कप, त्यातील वानखेडे मैदानावर होणारे सामने या संदर्भात त्यांनी पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडांच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.