जकार्ता – इंडोनेशियात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ज्वालामुखीचा लाव्हा डोंगराखालील गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.इंडोनेशियाच्या तेंगारा परगण्यातील फ्लोरेस बेटावलील लेवोटोबी लाकी लाकी डोंगरावर या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या उद्रेकानंतर लाव्हा व त्यातून निघालेले दगड चार किलोमीटर दूर असलेल्या गावांवर आदळल्याने अनेक घरांना आगी लागल्या. या उद्रेकाचा फटका जवळपास सात गावांना बसला. या ज्वालामुखीच्या ७ किलोमीटर परिघातील गावे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
