जकार्ता : इंडोनेशियाच्या पूर्व नुसा टेंगारा प्रांतात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे. मात्र, त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आला नाही.
हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ७.२५ वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर मध्य तिमोर रीजेंसीपासून ७४ किमी वायव्येस आणि समुद्राच्या तळाखाली ७५ किमी खोलीवर होता. भूकंपाच्या धक्क्यांमुळे हलके झटके जाणवले. या दरम्यान कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. दरम्यान जीवितहानी झाली नाही. समुद्रात महाकाय लाटा उसळल्या नाहीत. त्यामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नाही, असे येथील हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
इंडोनेशियात भूकंप त्सुनामीचा इशारा नाही
