नाशिक- मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरीजवळ भरधाव कारने टोइंग व्हॅनला जोरदार धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. एक जण गंभीर जखमी आहे.
नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना कारचा पुढील टायर फुटला. त्यानंतर ही कार मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश असून अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली.