रोम – इटलीच्या सिसिली शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली. विशेषतः टोर्रे आर्चिरफी शहरात पुराने हाहाकार माजवला. अनेक कार पाण्याच्या लोंढ्याबरोबर समुद्रात वाहून गेल्या.सिसिलीमधून आपत्कालीन सेवा विभागाकडे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचे मदतीसाठी कॉल आले. पुरामुळे जिवीत हानी झाली नाही.तसेच कोणी बेपत्ता असल्याचे वृत्त नाही,असे आपत्कालीन सेवा विभागाने आज सांगितले.मागील काही वर्षांपासून इटलीमध्ये पर्यावरण बदलाचे दुष्परिणाम नैसर्गिक आपत्तींच्या रुपाने वारंवार दिसून आले आहेत. उष्णतेची लाट, दुष्काळ, वादळे आणि पूर अशा अनेक आपत्तींचा सामना या देशाला करावा लागला आहे.
