इम्रान खानना भर न्यायालयात धक्काबुक्की! पायाला फ्रॅक्चर

लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे पुन्हा जखमी झाले आहेत. लाहोर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना उपस्थित लोकांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यात इम्रान खान यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती खान यांचा पक्ष पीटीआय अर्थात पाकिस्तान तहरीक- ए- इन्साफकडून देण्यात आली आहे.

पीटीआयचे खासदार शिबली फराज यांनी डॉ.दुर्रानी यांच्या ट्विटचा संदर्भ देत सांगितले की, इम्रान खान हे मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारुख यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय खंडपीठासमोर हजर झाले. यावेळी खान यांना दिलासा देणारा काही निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर उपस्थित काही लोकांनी इम्रान खान यांना धक्काबुक्की केली. त्यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्यांचा पाय मोडला असून डॉक्टरांनी त्यांना १० दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. शाहबाज सरकारने पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली नसल्याचा गंभीर आरोप इम्रान खान यांनी केला आहे. तसेच न्यायालयाचा आदर करत असून प्रकृती सुधरल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होतील, असे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.

इम्रान खान यांना १८ एप्रिल रोजी लाहोर उच्च न्यायालयाने एका प्रकरणात ३ मे पर्यंत जामीन मंजूर केला होता.जामीनाची मुदत वाढवून न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्याची विनंती इम्रान खान यांनी केली होती. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य करत त्यांना ३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा ही घटना घडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top