इस्लामाबाद- भारताच्या शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने एका महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी त्यांना अजामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे इम्रान खान यांना लवकरच अटक होण्याची दाट शक्यता आहे..
एवढेच नाही तर इम्रान खान यांना अटक करून २९ मार्च आधी न्यायालयात हजर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.२० ऑगस्ट रोजी एफ-९ पार्कमधील एका रॅलीत न्यायदंडाधिकारी झेबा चौधरी आणि पोलिस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे.दिवाणी न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी तीन पानांचा निकाल जाहीर करत तसेच या प्रकरणी इम्रान खान न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ