नवी दिल्ली: सध्या भारतीय बाजारपेठेत ईव्हीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. अनेक स्टार्टअप कंपन्यांव्यतिरिक्त, मोठे उत्पादक देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये त्यांची वाहने लॉन्च करत आहेत. एकीकडे ईव्हीच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल. हि जमेची बाजू असली, तरी दुसरीकडे यामुळे भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढणार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
याचे विशेष कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी कच्चा माल, खनिज प्रक्रिया आणि बॅटरी उत्पादनासाठी भारत चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात या उत्पदनांमध्ये वाढ झाल्यास भारटाचे चिंवरील अवलंबित्व वाढेल असे ईव्हीच्या आर्थिक थिंक टँक जीटीआरआयच्या अहवालानुसार समोर आले आहे.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह नुसार, इलेक्ट्रिक वाहनांमुळे भारतात प्रदूषण कमी होईल. मात्र भारतात ईव्ही तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या सामग्रीपैकी सुमारे ७० टक्के सामग्री चीन आणि इतर काही देशांमधून आयात केली जाते. जगात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश बॅटरी चीनने बनवल्या आहेत. सर्व्हेक्षणाद्वारे असेही आढळून आले आहे की प्रत्येक ४ पैकी ३ बॅटरी चीनने बनवल्या आहेत. १०० पेक्षा जास्त चीनी बॅटरी युनिट्स जोडणे, ६० टक्के कॅथोड्स आणि ८० टक्के एनोड्स लिथियम-आयन यात वापरले जातात. त्यामुळे ईव्हीच्या ऊत्पादन वाढले तर भारताला संपूर्णपणे चीनवर अवलंबून राहवे लागणार आहे. गेल्या वर्षी भारतात सुमारे १० लाख इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर यंदा हा आकडा आणखी वाढू शकतो. अशा स्थितीत हा चिंतेचा विषय असल्याचे जीटीआरआयच्या अहवालानुसार समजते.