अलिबाग : उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली. बोटीचा वेग कमी असल्याने मांडवा जेट्टीच्या खांबाला बोट घासली. सुदैवाने दोघेही सुखरूप असून, मोठी दुर्घटना घडली नाही.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी सामंत गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समवेत होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबांना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना टळली. नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. यांनतर मात्र मांडवा येथे सुखरुप उतरून पालकमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे हे मांडवा येथे रस्तेमार्गाने गेले.
उदय सामंत, संभाजीराजेंच्या