हिरोशिमा
जपानमध्ये सुरू असलेल्या जी-7 शिखर परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. सुनक यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे मोदी यांनी म्हटले. मोदींनी या भेटीचे फोटो देखील ट्विट केले.
जपानच्या हिरोशिमा येथे जी-7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जी-7 शिखर परिषद सुरु असताना काल मोदी आणि सुनक यांनी एकामेकांना मिठी मारून स्वागत केले. त्यानंतर आज सकाळी मोदी आणि सुनक यांनी भेट घेऊन व्यापार, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च शिक्षणांसह अनेक मुद्द्यांबाबत एकामेकांना सहकार्य करण्यावर सकारात्मक चर्चा केली. तसेच भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारच्या (एफडीआय) वाटाघाटीबाबत तपशीलवर चर्चा या बैठकीत करण्यात आले. दरम्यान, तसेच आज सुनक यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांची देखील भेट घेतली.
ऋषी सुनक आणि नरेंद्र मोदींची भेट व्यापारासह गुंतवणुकीवर चर्चा
