लंडन –
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या लंडनमधील डाऊनिंग स्ट्रीटच्या समोरील प्रवेशद्वारावर कार आदळल्याची घटना घडली.या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “येथील स्थानिक वेळेनुसार अंदाजे संध्याकाळी सव्वाचार वाजता एक कार डाउनिंग स्ट्रीटच्या गेटवर आदळली. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लंडनच्या डाउनिंग स्ट्रीटकडे जाणारा रस्ता बंद केला. डाउनिंग स्ट्रीटमधील अधिकाऱ्यांना आत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहनचालकाला अटक केली असून त्याच्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याच्या आरोप ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पांढरी प्रवासी कार डाउनिंग स्ट्रीटच्या गेटवर धडकल्याचे दिसत आहे. या घटनेत कोणीतीही जीवीतहानी झालेली नाही. चालकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.