नवी दिल्ली – एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने क्रु मेंबरला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाकडून क्रू मेंबरसोबत गैरवर्तनाची ही दोन महिन्यातील दुसरी घटना आहे.
एअर इंडियाने एक निवेदन जारी करून सांगितले की, २९ मे रोजी एका प्रवाशाने विमानात गैरवर्तन केले. प्रवाशाने क्रू मेंबर्सना शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्याने क्रू मेंबरवर हल्ला केला. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतरही प्रवाशाने आक्रमक वागणे सुरूच ठेवले. त्यामुळे त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. नियामकालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
विमानप्रवासात प्रवाशांची गैरवर्तनाची प्रकरणे सतत समोर येत आहेत. ११ मे रोजी दिल्ली-कोलकाता इंडिगो फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते.