ऑस्टिन – आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता तुमचे मनही वाचण्यास सक्षम आहे आणि ते शब्दातही मांडू शकणार आहे. ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या शास्त्रज्ञांच्या टीमने हे एआय मॉडेल विकसित केले आहे. अभ्यासानुसार, ते रिअल टाइममध्ये तुमच्या मेंदूचे वाचन आणि लिखाणही करू शकते. या अहवालाचे नेतृत्व जेरी तांग, संगणक विज्ञानातील डॉक्टरेट विद्यार्थी आणि यूटी ऑस्टिन येथील न्यूरोसायन्स आणि संगणक विज्ञानाचे सहायक प्राध्यापक एलेक्स हथ यांनी केले. हा अभ्यास अंशतः गुगल बार्ड आणि ओपन एआयच्या चॅटजिपीटी सारख्या ट्रान्सफॉर्मर मॉडेलवर आधारित आहे. हे एआय टूल पक्षाघात झालेल्या रुग्णांसाठी आणि अपंगांसाठी वरदान ठरणार आहे.
हे साधन एआय आधारित डीकोडर आहे जे मेंदूचा मागोवा घेते आणि एखादी व्यक्ती काय विचार करत आहे किंवा त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेते. या संशोधनादरम्यान तीन लोकांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. एकूणच संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.
एआय मानवी मनही वाचणार टेक्सास विद्यापीठाचे संशोधन
