सॅन फ्रान्सिस्को – एक्स सोशल मीडियाचे (पूर्वीचे ट्विटर) मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोहून टेक्सासमध्ये हलविण्याचा निर्णय कंपनीचे मालक अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी घेतला आहे. येत्या काही आठवड्यांत स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.ट्वीटर ही कंपनी २००६ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये करण्यात आली होती.त्यावेळी ट्वीटरमधील कामगारांची संख्या शंभर-दोनशेच्या आसपास होती. मात्र पुढील काही वर्षांत हा आकडा खूपच वाढला.त्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोमधील पेरोल कराचा कंपनीवरील बोजा वाढला. त्यावळे ट्वीटरने सॅन फ्रान्सिस्को सोडून पेरोल कर न आकारणाऱ्या जवळच्या ब्रिस्बेन या छोटया गावात आपले मुख्यालय हलविण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर तत्कालीन मेयर एड ली यांनी कंपनीला तसे करण्यापासून रोखण्यासाठी कर सवलत दिली होती. या करसवलतीची मुदत २०१९ मध्ये संपली.त्याचदरम्यान जगभरात कोरोना महामारी आली.इतर कंपन्यांप्रमाणे ट्विटर कंपनीलाही त्याचा फटका बसला. पुढे ऑक्टोबर २०२२ मध्ये इलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज डॉलरला विकत घेतली.ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी मोठी कामगार कपात केली गेल्या वर्षी मस्क यांनी टेक्सासच्या कर रचनेवर टीका करीत कंपनीचे मुख्यालय टेक्सासच्या ऑस्टिन शहरात हलविण्याचा मनोदय व्यक्त केला होता.