मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएन ) या कंपनीवरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत चालला आहे.कंपनीचे एकूण कर्ज तब्बल ३२,०९७.२८ कोटी रुपयांवर गेले आहे. एमटीएनएलने शेअर बाजाराची नियामक संस्था सेबीला ही माहिती दिली आहे.एमटीएनएलने विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून ५ हजार ४९२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. व्याजासकट ही रक्कम ५ हजार ७२६. २९ कोटी रुपयांवर गेली आहे. यातील व्याजाची रक्कम २३४.२८ कोटी एवढी आहे. हे कर्ज एमटीएनएलने थकविले आहे.एमटीएनएलचे ढोबळ वार्षिक उत्पन्न ७९८ कोटी रुपये आहे.त्या तुलनेने कंपनीवर असलेले कर्ज वार्षिक उत्पन्नाच्या चाळीस पटीने जास्त आहे.
