नवी दिल्ली – नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आज ११ दिवसांनी संप मागे घेतला. कोलकाता प्रशिणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केले. त्यानंतर आंदोलक निवासी डॉक्टरांनी देशाच्या हितासाठी आणि सार्वजनिक सेवेच्या भावनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. एम्समधील निवास डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले की, आरजी कार मेडिकल कॉलेजच्या घटनेची दखल घेतल्याबद्दल आणि देशभरातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या व्यापक समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून कौतुक करतो
