मुंबई – भीमा – कोरेगाव एल्गार प्रकरणातील आरोपी आणि कबीर कला मंच सांस्कृतिक कार्यकर्ते सागर गोरखे यांना विशेष न्यायालयाने सीईटी-कायदा प्रवेश परीक्षेला बसण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे.सागर गोरखे यांना पोलीस बंदोबस्तात केंद्रावर पाठवण्यात यावे आणि परीक्षा संपल्यानंतर त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात यावे, असे निर्देश दिले. विशेष न्यायाधीश दिनेश कटारिया यांनी एस्कॉर्टचे शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहे.गोरखे यांनी अधिवक्ता दीपा पुंजानी यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत तीन वर्षांच्या कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा असलेल्या परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. गोरखे यांच्यावर फिर्यादीने कबीर कला मंचचा सदस्य असल्याचा आरोप केला आहे,ज्याचा दावा आहे की तो प्रतिबंधित दहशतवादी संघटना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) ची आघाडीची संघटना आहे. त्यांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी एल्गार परिषदेच्या कॉन्क्लेव्हमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे.कारण या कार्यक्रमानंतरच दंगल झाली होती.
‘एल्गार परिषद’ आरोपीला कायद्याच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी
