काठमांडू
बीडचे गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांच्या पत्नीचा 4 वर्षांपूर्वी माउंट एव्हरेस्ट सर करताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत 23 मे रोजी शरद कुलकर्णी यांनी माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केले. पत्नी अंजली हिचे स्वप्न पूर्ण करत तिला आदरांजलीही वाहिली आणि तिरंगा फडकावला.
शरद कुलकर्णी आणि पत्नी अंजली यांनी सात खंडांतील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याचे ठरवले होते. 2019 मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केले तेव्हा त्यांना शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवता आला नव्हता.फोटोही काढता आले नव्हते. कारण माउंट एव्हरेस्ट सर करत असताना पत्नी अंजली यांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 22 मे 2019 रोजी मृत्यू झाला होता. पत्नीला शिखरावर सोडून खाली येण्याची वेळ आली होती. त्यांच्यासाठी एव्हरेस्ट जिंकूनही एक हरलेले स्वप्न ठरले होते. त्याच ठिकाणी शरद कुलकर्णी यांनी एव्हरेटस्ट सर करेन हे वचन दिलेले होते. चार वर्षांनंतर 22 मे 2023 रोजी कुलकर्णी एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले. अनेक अडथळे दूर केले आणि त्यानंतर त्यांनी शिखर गाठले आणि आपल्या पत्नीला आदरांजली वाहिली.
एव्हरेस्ट सर करून गिर्यारोहकानेपत्नीला वाहिली आदरांजली
