एसटीच्या १०० आगारांमध्ये
पूर्णवेळ व्यवस्थापक नाहीत

मुंबई – एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी १०० आगारांमध्ये पूर्णवेळ आगार व्यवस्थापक नाहीत. त्यामुळे \’प्रभारी\’ व्यक्तीकडे कारभार देऊन, दिवस ढकलण्याचे काम सुरु असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला. काही महिन्यांपूर्वी उत्पन्न वाढीसाठी बढती परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा थोडासा परिणाम होऊन कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. मात्र, आगार व्यवस्थापकांच्या परीक्षा होऊन ६ महिने लोटले तरीही बदल्या आणि बढत्यांचा घोळ संपत नाही, अशी माहिती संघटनांनी दिली.

या बदल्या आणि बढत्या महामंडळातील एका महिला अधिकाऱ्यामुळे रखडल्या असल्याचे सांगण्यात येते. \’बदल्या झालेले अधिकारी महिना उलटला तरी नवीन ठिकाणी रुजू होण्यास तयार नाहीत. या संदर्भात वरिष्ठांनी वेळोवेळी निर्देश देऊनही संबंधित महिला अधिकारी फक्त वेळ दवडण्याचे काम करीत आहेत. याची दखल अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी,\’ अशी मागणी अन्यायग्रस्त अधिकाऱ्यांनी केली.

Test Blog 1

Test Blog 2

Test Blog 3

Scroll to Top