एसटीतील आजारी प्रवाशांचा मोफत प्रवास बंद होणार !

मुंबई – एसटी महामंडळाच्या गाड्यांमधून विविध समाजघटकांना सवलतीच्या दरात तसेच मोफत प्रवासाचीही सुविधा दिली जाते. मात्र आता यातील
सिकलसेल,एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण आदींना मिळणारी विनामुल्य प्रवास सवलत बंद करण्यात आली आहे. ही सवलत बंद करण्याचे आदेश नुकतेच एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक ) शि.मं.जगताप यांनी दिले आहेत.या घटकांना आता निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही.केवळ साध्या एसटीतूनच मोफत प्रवास करता येणार आहे.
एसटीच्या वाहतुक विभागाच्या २०१८ सालच्या परिपत्रकानुसार,सिकलसेल,एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त या दुर्धर आजारी रूग्णांना एसटीतून मोफत प्रवास सवलत देण्यात आली होती. मात्र आता अशा रूग्णांना एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत मिळणार नाही. त्यांना आता केवळ साध्या बसमधून ही सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळ सुमारे २९ समाजघटकांना प्रवासी भाड्यात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देत असते. यामध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत दिली जाते.त्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.तर दुसरीकडे रुग्णांची सवलत कमी करण्याचे धोरण एसटी महामंडळाने अवलंबिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top