नवी दिल्ली – येत्या ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनापासून ते रक्षाबंधन आणि ओणमपर्यंत अनेक सण आहेत,त्यामुळे साप्ताहिक सुट्ट्यांसह तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार आहेत.म्हणजेच जवळपास हा अर्धा महिना सुट्ट्यांचा असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने या महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्यांच्या सुट्ट्यांसह १४ दिवस बँका बंद राहणार आहेत.तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.या महिन्यातील ६,८,१२, १३,१५,१६,१८,२०,२६,२७,२८,२९,३० आणि ३१ ऑगस्ट अशा या सुट्ट्यांच्या तारखा आहेत.यामध्ये ६ ऑगस्टला रविवार,१२ ऑगस्टला दुसरा शनिवार,१३ ऑगस्टला रविवार,१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन,१६ ऑगस्टला पारशी नववर्ष,१८ ऑगस्टला गुवाहाटीमध्ये श्रीमंत शंकरदेव तिथीमुळे बँका बंद,२० ऑगस्टला रविवार,२६ ऑगस्ट चौथा शनिवार,२७ ऑगस्ट रविवार,२८ ऑगस्टला ओणममुळे आणि २९ ऑगस्टला कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद, ३० ऑगस्टला रक्षाबंधन आणि ३१ ऑगस्टला डेहराडून,गंगटोक,कानपूर, कोची,लखनऊ आणि तिरुवनंतपुरमध्ये रक्षाबंधनमुळे बॅंकांना सुट्टी असणार आहे.