ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून
भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

सिडनी : सिडनीत ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीयाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना ऑबर्न रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. जेव्हा भारतीय नागरिक मोहम्मद रहमतुल्ला सय्यद अहमद ने २८ वर्षीय सफाई कामगारावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याने पोलिसांनाही धमकावले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडाल्या आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना मंगळवारी रात्री घडली. मोहम्मद अहमदने सिडनी रेल्वे स्थानकावरील क्लिनरवर चाकूने हल्ला केला असा ऑस्ट्रेलिया पोलिसांचा आरोप आहे. त्यानंतर त्याने २ पोलिस अधिकाऱ्यांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी स्वतःच्या रक्षणासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोन गोळ्या अहमदच्या छातीत लागल्या. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.ऑस्ट्रेलियातील भारतीय वाणिज्य दूतावासाने हल्लेखोर भारतातील तामिळनाडू राज्यातील असून तो येथे राहत असल्याची माहिती दिली आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने या संदर्भात ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे.

Scroll to Top